Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई अहमदाबाद महामार्ग, तसेच महापालिका हद्दीतील विकास कामासंदर्भात खासदार राजेंद्र गावित यांनी आज महामार्ग नियोजन प्राधिकरण, महापालिका, पोलिस विभाग यांन सोबत महत्वाची बैठक 

संबंधित अधिकारी यांना खासदारांच्या महत्वाच्या सूचना

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विरार, दि. ७ ऑक्टोबर : रोजी महापालिका मुख्यालय विरार येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील रस्ते, नाले यासंदर्भात महत्वाच्या विषयावर महामार्ग नियोजन प्राधिकरण चे मुख्य अधिकारी अगरवाल, महापालिका आयुक्त पवार तसेच पोलीस उपायुक्त तसेच संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्या उपस्थितीत महामार्गावर होणारे अपघात, रस्त्यांची दुरवस्था, तसेच महापालिका हद्दीतील रस्ते, नाले, नैसर्गिक नाल्यांवर झालेले अतिक्रमण अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर सदर बैठकीत चर्चा झाली, अनेक समस्या, विषय संबंधित विभागाकडून पूर्ण करण्यात अधिकारी टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यावर खासदारांनी संताप व्यक्त करून संबंधित अधिकारी यांना सदर कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या,

सदर बैठकीला पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, तालुका प्रमुख सुदेश चौधरी, उप तालुका प्रमुख अतुल पाटील, तसेच माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

स्मिता-जयदेव ठाकरेंवर कीर्ती फाटक यांचा हल्लाबोल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरेंना महागाई, हिंदुत्वाची आठवण झाली; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.