Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.4:  सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (१९ एप्रिल २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.

12 गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात, सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 19 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जबरी चोरी करणा­या दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

ना.विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी आ.प्रतिभा धानोरकर गडचिरोलीत

ओबीसी बहुल चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.