Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ना.विजय वडेट्टीवारांच्या भेटीसाठी आ.प्रतिभा धानोरकर गडचिरोलीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ४ : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप निश्चित नव्हते. त्यामुळेच राज्यभरात मतदारसंघात रोज नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे . अशातच गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर लोकसभा  होते महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटप निश्चित झाले असले तरी “कही ख़ुशी कही गम” हि स्थिती असल्याने मतभेद दिसून येत आहे .अशातच विदर्भातील लोकसभा लक्ष केंद्रित असलेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणूक अपवाद कसे राहणार !

चंद्रपूर लोकसभा निवडणूकीसाठी २०२४ प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असताना वडेट्टीवार गटानेही उमेदवारीवर दावा केला होता. यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. अखेरच्या क्षणी वडेट्टीवार गटाने धानोरकरांना निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. मात्र वडेट्टीवारांनी आपला मुक्काम गडचिरोलीला हलविला. भाजपकडून काँग्रेसमधील नाराज घटकांना आपल्याजवळ करणे सुरू आहे तर काँग्रेस पक्षात हि  नाराज नेते असल्याने मनोमिलनात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बाजार समित्यांच्या निवडणुकीपासून चंद्रपूर काँग्रेस नेते दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील विरोध चव्हाट्यावर आला होता. यामध्ये वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक प्रकाश देवतळे यांना भाजपसोबत युती केल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष पदावरून दूर केले होते. आता प्रकाश देवतळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

जिल्हा बँकेत काँग्रेसची सत्ता असताना बँकेची भरती प्रक्रिया थांबविण्यासाठी धानोरकर दाम्पत्यांनी संसदीय आयुधांचा वापर केला होता. हे मतभेद दूर सारून संतोषसिंह रावत यांना जवळ करण्यात प्रतिभा धानोरकर यांना यश आले आहे. त्यानंतर हि   दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांनी बुधवारी काँग्रेसचे  राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यासाठी गडचिरोलीला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. दरम्यान, भेटीत बंदद्वार चर्चा झाली असल्याने काही माहितीची स्पष्ट झाले नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

निवडणूक निरीक्षक पराशर यांची आरमोरी व चिमुर विधानसभा मतदार क्षेत्राला भेट

“माँ कि रोटी”मिळणार माफक दरात

 

Comments are closed.