Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ वायरल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पावसात खेळणा-या वाघ बछड्यांचे व्हिडिओ सध्या वायरल होत आहेत. पावसाळा सुरू होताच ताडोबाचे गाभा क्षेत्र पर्यटनासाठी बंद केले जाते. त्यानंतर केवळ बफर क्षेत्रातील १६ प्रवेशद्वारातून पर्यटकांना टायगर सफारीची मुभा असते. काहीच दिवसांपूर्वी या प्रवेशासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू झाली आहे. सध्या ताडोबाच्या बफर क्षेत्रातही व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटक आनंदी आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुनील मेहता नामक पर्यटकाने चित्रित केलेला वाघ बछडे पावसात खेळत असल्याचा व्हिडिओ वायरल झालाय. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची बफर भागातील पावसाळ्यातील श्रीमंती अवर्णनीय असल्याचे पर्यटकांचे मत आहे.  कोरोनाकाळात व्याघ्र पर्यटनावर संक्रांत ओढविली असताना या वायरल व्हिडीओने व्याघ्रप्रेमींच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोलामार्का आरक्षित वनक्षेत्रातील वृक्षतोडीची होणार चौकशी; उपवनसंरक्षकांनी दिले आदेश

सुरजागड मार्गावर नक्षल्यांनी झाड पाडून मार्ग केला बंद; नक्षली पत्रके आढळली

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.