Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…

चितळाला धडक देऊन ट्रकचालक पसार होण्याच्या मार्गावर असतांना वनविभागाने सापळा रचून घेतले ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

गडचिरोली, दि. १ जानेवारी : गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप रस्ता ओलांडतांना भरधाव येणाऱ्या ट्रकने एका चितळाला धडक दिल्याने चितळ जागीच ठार झाला. हि घटना ट्रक चालकाच्या लक्षात येताच पसार होण्याच्या मार्गावर असतांना वनविभागाने मोठ्या शिताफीने आरोपीला व ट्रकला ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

                                    ट्रकच्या धडकेत जागीच ठार झालेला चितळ.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेल्या वाकडी फाट्याजवळून कक्ष क्र. १६९ च्या जंगलातून दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास चितळाचा कळप मुख्य रस्ता ओलांडत असताना चामोर्शीकडून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्र. एमएच-३५ के – २७१० ने एका चितळाला धडक दिली. त्यात जागीच चितळ ठार झाल्याची घटना गडचिरोली वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती प्राप्त झाली.

त्यावेळी वनपरिक्षेत्र गडचिरोलीतील संपूर्ण वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेत असतांना सदर ट्रकचालक वडसा मार्गे गेल्याची माहिती वनपथकाला प्राप्त झाली असता लगेच घटनेबाबत वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आणि सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांना देताच तात्काळ नाकेबंदी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यावेळी ट्रकचालकाच्या लक्षात येताच ट्रक ठेऊन पसार होताच वनविभागाच्या कर्मचाऱ्याने मोठ्या शिताफीने आरोपीचा मागोवा घेत आरोपी व ट्रकला ताब्यात घेत गडचिरोली वनाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले असून आरोपीवर वनगुन्हा नोंदविण्यात आला असून मृत चितळाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृत चितळाचे दहन करण्यात आले.

या घटनेचा अधिक तपास डॉ. कुमारस्वामी उपवनसंरक्षक, वनविभाग गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात सोनल भडके सहाय्यक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली, अरुप कन्नमवार क्षेत्र सहाय्यक गडचिरोली, वनरक्षक भारत राठोड, धर्मराव दुर्गमवार, अजय कुकुडकर वन्यजीव प्रेमी व सर्व वन कर्मचारी करीत आहे.

गडचिरोली वनपरिक्षेत्र संपूर्ण जंगल व्याप्त असून या जंगलातून मुख्य रस्ते ही गेले आहेत. याशिवाय या जंगलात विविध वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. वन्यप्राणी चारा, पाण्यासाठी भटकंती करीत असतात. अशावेळी मुख्य रस्त्यावरून वाहने हळू चालविण्याचे वनविभागाने आवाहन करून मोठे फलक रस्त्यावर लावून जनजागृती केली आहे. तरीही वाहन चालकाकडून दुर्घटना घडत असतात. अशावेळी दुर्घटनाग्रस्त वन्यप्राण्याची माहिती जागरूक नागरिकांनी तात्काळ वनविभागाला देऊन वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यास मदत करावी.

   अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली

हे देखील वाचा : 

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

नववर्षाच्या स्वागतानिमीत्त श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरास नयनरम्य फळा-फुलांची आरास

 

 

 

Comments are closed.