Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • वाघ शिकार प्रकरणात आंतरराज्य टोळी असल्याचे वन विभागाच्या चौकशीत होत आहे निष्पन्न.
  • वाघ शिकार प्रकरणात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये भा.व.से.,गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर भा.व.से. यांची घटनास्थळावर प्रत्यक्ष भेट.
  • वाघ शिकार प्रकरणात २४ तासात प्रकरणाचा छडा लावून मुख्य आरोपीसह वाघाचे गहाळ अवशेष शोधण्यात यश आल्याने चौकशी पथकातील अधिकाऱ्यांचे मुख्य वनसंरक्षकांनी केले अभिनंदन.

गडचिरोली, दि. १ जानेवारी २०२२ : आलापल्ली वनविभागात येणाऱ्या अहेरी परिक्षेत्रातील कक्ष ६१५ मध्ये दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी वाघ या वन्यप्राण्याची शिकार करुन त्याचे शिर व वाघनखे काढुन उर्वरीत मृत वाघ शव ओढयात रेती मध्ये पुरन्यात आले होते. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांचेकडुन वाघनखे ८ नग, वाघदात ४ नग, वाघ मिशी १० नग व वनगुन्हयातील अन्य मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संबंधित बातमी : वाघाची शिकार करून पुरले जमिनीत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, सदर आरोपी मोसम गावातीलच असून ईसम रघु पुल्ला गेडाम (५६) लक्ष्मण बुधा वेलादी (३८) राकेश रघु गेडाम (२५) असे त्यांचे नाव आहेत. सदर आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेकडुन वाघनखे ८ नग, वाघदात ४ नग, वाघ मिशी १० नग व वनगुन्हयातील अन्य मुद्देमाल ताब्यात घेवुन सदर आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) (ड), २६ (१) (अ), २६ (१) (आय) वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४८, ४९ (ख) ५० (१) या कलमान्वये गुन्हा दाखल करुन न्यायालय प्रथम श्रेणी न्यायालय, अहेरी यांचे समक्ष आरोपी क्र. १ व २ यांना सादर केले असता न्यायालयाने १० दिवसाची वनकोठडी दिली आहे.

प्रकरणातील आरोपी क्र. ३ राकेश रघु गेडाम हा वनविभागाचे ताब्यातुन वनकर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार झाला असुन त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन, अहेरी येथे वनविभागाच्या ताब्यातुन फरार झाल्या बाबत गुन्हा नोंद करण्याकरीता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रकरणाचे तपास सुरु असुन सदर प्रकरणाचे राज्या बाहेर धागेदोरे असल्याने वनविभागाचे तीन पथक इतर राज्यात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले असून आणखी आरोपीची संख्या वाढण्याची सध्या दाट शक्यता आहे.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये भा.व.से.,गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर भा.व.से. यांनी मोकास्थळावर प्रत्यक्ष भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली व २४ तासाचे आत प्रकरणातील मुख्य आरोपीसह वाघाचे गहाळ अवशेषाचे शोध लावुन आरोपींना ताब्यात घेत अतिशय शिघ्र गतीने तपास केल्याबद्दल चौकशी पथकातील वन अधिकारी व वनकर्मचारी यांचे अभिनंदन केले.

सदर प्रकरणाचा पुढील तपास प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर सुनिल लिमये, गडचिरोली वनवृत्ताचें वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, आलपल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलीया यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी अधिकारी नितेश देवगडे, उपविभागीय वन अधिकारी, आलापल्ली हे करत असुन चौकशी कामी आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा शिगोने, तसेच वनपाल नरेंद्र वड्डेटीवार, संतोष पडालवार, मोहन भोयर, प्रभाकर आनकरी, अनिल झाडे, बाबुराव मद्देलावार नामदेव मडावी वनरक्षक बाळु मडावी, चंदु सडमेक, कैलाश परचाके, निलेश टेकाम, शरद उराडे, गोविंदा दोहतरे, अतुल कातलाम, प्रकाश नंदगिरीवार, महेशखोब्रागडे, हेमराज कुमरे, किरण आत्राम रसिका मडावी, साधना मडावी, संगिता हनवते, किशोरी नन्नावरे, पुजा कुसराम, अल्वीन उप्पल, कविश्वर भांडेकर, संजय अलोने, धिरज पवार, नामदेव बावणे, दिनेश हलामी, प्रभाकर वेलादी, गणेश पस्पुनुरवार, वाहन चालक राजु येडलापूरी, विक्की कोडापे, ईस्मीद शेख, अनिल रुडे, सचिन डांगरे, अशोक आत्रम, योगेश गंजशेट्टीवार आदी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

हे देखील वाचा  : 

मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

 

 

Comments are closed.