Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस विभागामार्फत अतिदुर्गम भागातील १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे वाटप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भामरागड, दि. २ जानेवारी : पोलीस मदत केंद्र कोटी येथे दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी जन जागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पोलीस विभागामार्फत १९ कुटुंबाना गॅस सिलेंडरचे (कनेक्शन) वाटप करण्यात आले.

सदर मेळाव्याचे आयोजन गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजना व कृषी योजना बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. मासू रामा लेकामी कोटी यांनी उपस्थित नागरिकांना गोंडी/माडिया भाषेत शासकीय योजनांची माहिती देऊन शासनाच्या सर्व योजनांचे परिपूर्ण लाभ घेतील असे आश्वासन दिले.

तसेच प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे यांनी दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत पोमके कोटी हद्दीतील नागरिकांचे आधार कार्ड नूतनीकरण करून हद्दीतील नागरिकांची तालुक्याच्या ये-जा करण्याची समस्या “पोलीस दादालोरा खिडकी”च्या माध्यमातून दूर करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर मेळाव्यामध्ये पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १९ कुटुंबाना गॅस सिलेंडर (कनेक्शन) चे वाटप करण्यात आले. तसेच १३ नागरिकांचे नवीन आधार कार्ड नोंदणी तर ८० जणांचे आधार कार्ड नुतनिकरण करण्यात आले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाचे ४४ नागरीकांचे  ऑंनलाईन अर्ज भरण्यात आले. तसेच २० नागरिकांचे ई – श्रम कार्ड साठी ऑंनलाईन अर्ज भरून देण्यात आले.

तसेच सर्व आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर असल्याचे  पोमके कोटीचे प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे यांनी नागरिकांना सांगितले व नागरिकांना शासकीय कागदपत्राचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित नागरिकांना जेवणाची सोय करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सदर मेळाव्याप्रसंगी प्रभारी अधिकारी श्रीनिवास धुळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ, कोठी येथील प्रतिष्ठित नागरिक बंडी रामसाई पुंगाटी, महारी पंढरू गोटा, गाव पाटील कन्ना हेडो व सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट रीजेश राज, अमरावती पोलीस उपनिरीक्षक सावसाकडे तसेच मौजा कोटी, मरकनार, बाडशी, तोयणार, तुमरकोडी, मुरूमभुशी, पिडमिली, पोयरकोटी, गुंडूरवाही येथील २५० ते ३०० नागरिकांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सफौ/सपाटे, पोना/गोरले, पोना/मेश्राम, पोशी/इंद्रजीत शेंडगे, पोशी/राजेंद्र पुरी, पोशी/अंकुश खंदारे, पोशी/प्रशांत जाधव मपोना/कामतकर, मपोशी/कोयल मांदाळे, मपोशी/गीतमाला गदवार तसेच एस.आर.पी.एफ. जवानांचे सहकार्य लाभले

हे देखील वाचा : 

वाघ शिकार प्रकरण : दोन आरोपींना १० दिवसाची वनकोठडी तर एक आरोपी वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन फरार

मोठी बातमी : ट्रकच्या धडकेत चितळ जागीच ठार…

नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाचा नदी पात्रात बुडुन दुर्दैवी मृत्यु!

 

 

Comments are closed.