‘बार्टी’ च्या वतीने संविधान साक्षरता अभियानातंर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन
संविधान साक्षरता अभियानातंर्गत अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा १९८९ विषयी प्रबोधन कार्यक्रम संपन्न.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक, दि. ९ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने तसेच विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर-संविधान साक्षरता अभियान पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन राबविले जात आहे.
या अनुषंगाने नाशिकच्या त्रंबकेश्र्वर तालुक्याच्या अंजनेरी गावातील तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणात मंगळवारी दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी समतादुत सुजाता वाघमारे यांच्यामार्फत संविधान साक्षरता बाबत विविध विषयांस अनुसरून प्रबोधन व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमाची सरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर त्रंबकेश्र्वर तालुक्यातील ‘बार्टी’ चे समतादूत सुजाता वाघमारे यांनी अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा १९८९ ची ओळख करून देत भारतीय संविधानचे महत्व विशद केले.
त्यानंतर सदरच्या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्यास भारतीय संविधान पुस्तिका व स्पर्धा परीक्षा पुस्तिका (चालू घडामोडी) बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते.

प्रसंगी साक्षी सुखदेव शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक भिमराव रामचंद्र पवार तर तृतीय क्रमांक रितेश शशिकांत शिंदे यांनी प्राप्त केला. याप्रसंगी बार्ट्टी च्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका यावलकर व शिक्षक मनोज शिवदे यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाअंती उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन देखील करण्यात आले. ‘असे वैशिटयपूर्ण उपक्रम नेहमीच राबवले जावे’ अशी प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी वर्ग, बचत गट महिला वर्ग व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
हे देखील वाचा :
बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…


Comments are closed.