Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विकृत महिलेच्या धक्काबुक्कीत महिला पत्रकार ट्रेनमधून पडून गंभीर जखमी…

पश्चिम रेल्वेच्या बोईसर-पालघर स्थानकादरम्यान लोकलमधे विकृत महिलेचा धिंगाणा...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. ९ फेब्रुवारी :  पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते विरार दरम्यान प्रवास करताना महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. डहाणू येथून १० वाजून ५ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्ब्यात एका विकृत, वेडसर महिलेने धिंगाणा घातल्याने महिला प्रवाशांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी झालेल्या गोंधळामुळे एक ३६ वर्षीय महिला पत्रकार ट्रेनमधून पडून पत्रकार मेस्त्री या गंभिर जखमी झाल्याची घटना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

यासंदर्भातील सविस्तर हकीगत अशी की, पत्रकार विभूती (रुपाली) मेस्त्री यांनी बोईसर स्थानकातून नेहमीप्रमाणे १० वाजून २८  मिनिटांची डहाणू-विरार लोकल ट्रेन सफाळे येथील कार्यालयात जाण्यासाठी पकडली होती. दरम्यान, लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यामध्ये एक विकृत वेडसर महिलेने उमरोळी स्थानकापासून धिंगाणा घालून महिला प्रवाशांच्या अंगावर धावून त्यांना मारण्याचा व चालत्या गाडीतून ढकलण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामुळे डब्ब्यात अतंत्य घबराटीचे व गोंधळाचे वातावरण झाल्याने पत्रकार विभूती मेस्त्री यांनी व अन्य दोन महिलांनी प्रसंगवधान राखून रेल्वे पोलिसांच्या १५१२ व १३९ या दोन्ही हेल्पलाईनवर तात्काळ मदतीसाठी संपर्क केला मात्र, दोन्ही क्रमांकावर अशा बिकट प्रसंगात संपर्क झालाच नाही. अखेर ट्रेन पालघर स्थानकात येत असताना पत्रकार विभूती मेस्त्री यांनी जीवाची बाजी लावून दरवाजात येऊन रेल्वे पोलीसांना शोधण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नांत ट्रेनच्या डब्यातील गोंधळामुळे पत्रकार विभूती मेस्त्री या चालत्या ट्रेनमधून फलाटावर पडून रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाल्या. यानंतर रेल्वे पोलिसांनी तेथे धाव घेऊन सदर विकृत महिलेला ताब्यात घेतले. तसेच स्थानकातील डॉक्टरांच्या मदतीने पत्रकार विभूती मेस्त्री यांच्यावर औषध उपचार करण्यात आले. मात्र सदर महिला विकृत, वेडसर असल्याचे कारण पुढे करत पालघर लोहमार्ग पोलिसांनी तिला सोडून दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पश्चिम रेल्वेच्या वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव व डहाणू या स्थानकांना काही वर्षांपूर्वी उपनगरीय स्थानकांचा दर्जा प्राप्त झाला होता. मात्र उपनगरीय स्थानकातील सोयीसुविधांपासून आजही येथील स्थानके बोडकीच पडली आहेत. स्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असणारी (जी.आर.पी. व आर.पी. एफ. ) लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांची अपुरी कर्मचारी संख्या तसेच स्थानकातील अनुचित प्रकारांवर तिसरा डोळा म्हणून सुरक्षात्मक नजर ठेवणारी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा याच्या अभावामुळे आजही ही सर्व स्थानके व प्रवासी धोकादायक परिस्थितीत प्रवास करीत आहेत.

अशातच रेल्वे पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या हेल्पलाईन क्रमांकाचे गंभिर परिस्थितीत नॉटरीचेंबल असणे? महिलांच्या डब्ब्यात सुरक्षेच्या दृष्टीने महिला किंवा पुरुष पोलीस कर्मचारी दिवसा तैनात नसणे? ट्रेन स्थानकात असल्यानंतरही महिलांच्या डब्ब्याजवळ पोलीस कर्मचारी तैनात नसणे? अशा अनेक गोष्टींमुळे रेल्वे पोलीस कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहेत की फक्त आर्थिक गणितात मशगुल आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : 

बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…

 

खुशखबर.. “या” जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या ७० बसेस धावत आहेत रस्त्यावर

महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

 

Comments are closed.