Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सकाळी आविस मध्ये प्रवेश तर संध्याकाळी रा.काँ.मध्ये घरवापसी देवलमरी ग्रा.पं सदस्या रिमा मडावी रा.काँ.पक्षात परतली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली १४ ऑगस्ट :देवलमरी येथील ग्राम पंचायत सदस्या रिमा नागेश मडावी ही शनिवार रोजी आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश करून काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अर्थात स्वगृही परतल्याने  तिचा आविस मधील प्रवेश ओट घटकेचा ठरला आहे .आज सकाळी रीमा मडावी हिने जी. प अध्यक्ष अजय कंकडालवार  यांच्या उपस्थितीत अहेरीत अविस मध्ये प्रवेश घेतला होता .

आज संध्याकाळी   माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री  आत्राम यांनी रा.काँग्रेस पक्षातील ग्राम पंचायत सदस्यांसोबत रिमा मडावीची प्रत्यक्षात भेट घेऊन  तिची मनधरणी केली व स्वगृही परतल्याबद्दल गळ घातली त्यामुळे तिने राका मध्ये घरवापसी केली  .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे सकाळी आविस मध्ये  प्रवेश तर संध्याकाळी रा.काँ.मध्ये   तिची घरवापसी  झाली आहे .

येत्या काळात जीप न.प  निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग व आउटगोइंग ला जोर येणार आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

देवलमरी ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीला पडले खिंडार पुन्हा एका ग्रापं सदस्याचा आविस मध्ये प्रवेश

गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाची घोषणा

 

श्वानाच्या शिकारीसाठी गेलेला बिबट्या पडला विहिरीत,श्वान व बिबट्या दोघेही जिवंत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.