Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथील दुर्दैवी घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सिंधुदुर्ग, दि. १६ जानेवारी : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी-बागायतवाडी येथे घरात सिलेंडरचा स्फोट होऊन वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास घडली आहे.

वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९), अशी त्या दोघांची नावे आहेत. सुदैवाने वसंत यांची पत्नी मासे विकण्यासाठी बाहेर असल्यामुळे त्या अपघातात वाचल्या. मात्र घर अर्धे जळून खाक झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत वडील वसंत यांना काही दिवसापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे प्रकृती खालावल्याने ते घराबाहेर पडत नसत. तर मृतक गणेश  त्यांचा मुलगा हा वडलांची देखभाल करण्यासाठी घरी असायचा. वसंत यांची पत्नी मासे विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होती.

दरम्यान ती नेहमी प्रमाणे आज सकाळी मासे विक्री करण्यासाठी वेंगुर्ले बाजारपेठेत गेली होती. तर वसंत व गणेश हे दोघेच बाप-लेक  घरात होते. त्यांच्या घराशेजारी जेवण बनविण्यासाठी पडवी बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. मात्र पहिल्यांदा पडविला आग लागली की, सिलेंडरचा स्फोट पहिला झाला, हे स्पष्ट झाले नाही नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती वेंगुर्ले पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला माहिती देऊन सदर घटनास्थळी येण्याचे कळविले. वेंगुर्ले अग्निशमन दलामार्फत आग विझवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पोहोचून पंचनामा केला असून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.

 

हे देखील वाचा : 

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.