Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात आज 119 कोरोना बाधितांची नोंद तर 22 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १६ जानेवारी : गडचिरोली जिल्हयात आज ७२४ कोरोना तपासण्यांपैकी ११९ नवीन कोरोना बाधित झाले आहे असुन २२ जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित ३१६२१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ३०२७३ आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५९९ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण  ७४९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण १.८९ टक्के तर मृत्यू दर २.३७ टक्के झाला आहे.

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील ६४, अहेरी तालुक्यातील ०६, आरमोरी तालुक्यातील ०२, भामरागड तालुक्यातील ०७, चामोर्शी तालुक्यातील ०५, धानोरा तालुक्यातील ०४, एटापल्ली तालुक्यातील ०१, मुलचेरा तालुक्यातील ०२, सिरोंचा तालुक्यातील ०२, कोरची तालुक्यातील ०४, कुरखेडा तालुक्यातील ०१ आणि वडसा तालुक्यातील २१ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २२ रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील १८, चामोर्शी तालुक्यातील ०१, आणि वडसा तालुक्यातील ०३ जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात बाप-लेकाचा जागीच मृत्यू…

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

 

Comments are closed.