Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला कोरचीत १०० टक्के प्रतिसाद

कोरची तालुका कडकडीत बंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

कोरची : 28 जुलै ते 3 आगस्ट दरम्यान नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदला पहिल्याच दिवशी कोरची आणि संपूर्ण तालूक्यात लोकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.

यापूर्वी या तालुक्यात नक्षलवाद्यांनी पोलीसांचे खबरे, जनतेला लुबाडणूक करणारे अशा अनेक लोकांना जीवंत मारले आहेत. दोन-तीन वर्षापासून हे प्रकार कमी झाले असले तरी दहशत मात्र कायम आहे. त्यामुळे नक्षलवादी जेव्हा जेव्हा बंद पुकारतात, या तालुक्यात जनतेचा १०० टक्के प्रतिसाद असतो. त्याला कारणही असेच आहे. या तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, जंगली परिसर, नेतृत्व विहीनता आणि सुरक्षेचा अभाव. त्यामुळे लोक आपापले जीव मुठीत धरून कामे करतात. .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपूर्ण बाजारपेठेसह,आठवडी बाजार, किराणा दुकान, कापडाचे दुकान, हाॅटेल, पानटपऱ्या पासून सर्वच प्रकारचे दुकाने बंद होते याशिवाय खाजगी वाहने, कंत्राटदारांची कामे, शेतीची कामे सुध्दा कडकडीत बंद करण्यात आली होती. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. महामंडळाच्या बसेस सुध्दा बंद होत्या. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांची तारांबळ उडाली.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.