Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात पोलीस दलास आले यश

गडचिरोली पोलीस दलास यश ;विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळुन लावला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, २० सप्टेंबर : विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे .

काल दि,१९ सप्टेंबर २१ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. बहादुर जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२१ सप्टेबर २०२१रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावुन मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळुन लावण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे ३५ ते ४० नक्षलवादी शिबीर लावून असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, मोठया प्रमाणावर पिट्टू व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले. आयईडी व कुकर बॉम्ब हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवादयांचा नक्षलवाद्यांचा मोठा शिबीर उधळुन लावण्यात यश मिळविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.सोमय मुंडे सर,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) श्री. मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक.श्री समीर शेख सर (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले. विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे संकेत दिले.

हे देखील वाचा ,

पोलिस आणि नक्षल्यांतउडाली चकमक..

नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.