Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन सापांना हातात पकडून फिरणारा माथेफिरू…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर एक माथेफिरूने दोन मोठ्या सापांना हातात पकडुन फिरवत केला प्राण्यांचा छळ केल्याची घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे सुरुवातीला हे दोन्ही साप या माथेफिरूच्या तावडीतून स्वतःची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत होते. केविलवाणा प्रयत्न मात्र त्या माथेफिरुकडून त्यांना स्वतःची सुटका करून घेता आली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या माथेफिरुने दोन्ही सापांचे तोंड दोन्ही हातानी दाबून ठेवल्यामुळे त्यांना आपली सुटका करून घेता आले नाही….बराच वेळ हा माथेफिरु दोन्ही साप घेऊन महामार्गावर  फिरत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाटेल ती बडबड करत होता, तसेच हसतही होता. हे दोन्ही साप हातात पकडून तो येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दाखवत होता. त्यानंतर या दोन्ही सापांची हालचाल थांबल्याचे दिसुन आले.

 

हा माथेफिरू कोण? त्याने हे साप कुठून आणले होते? ते साप वारले का? त्यांना नेमकं कुठे सोडण्यात आले? असे, एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.  वन विभाग आणि पोलीस प्रशासने या माथेफिरूला पकडून त्याला अद्दल घडवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे देखील वाचा :

एसटी कर्मचारी संपावर ठाम, राज्य शासनाचा जीआर अमान्य; संप अधिक चिघळण्याची शक्यता

भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

सामाजिक कार्यकर्तीच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.