Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात ! दुचाकी चालकाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: आज सायंकाळ ८ वाजताच्या दरम्यान गडचिरोली पोलीस स्टेशन समोर ट्रक च्या खाली (ऍक्टिवा) दुचाकी चालक आल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा अपघात एवढा भयानक होता की ट्रकच्या चाकात आलेल्या दुचाकी चालकाच्या धडाचा पार चेंदामेंदा झाला .
या अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव दुर्गेश सुरेश नंदनवार रा.गडचिरोली असून तो सुंदरम फाईंनान्स मध्ये काम करीत होता.

 

चंद्रपूर च्या दिशेने इंदिरा गांधी चौकाकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. १२ एम.व्ही. ०३४९ ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी क्रमांक. एम. एच. ३३ बी. वाय. ६६१५ चा चालक चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ट्रक चालक गाडी सोडून फरार झाल्याची माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा :

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

एसटी कर्मचारी संपावर ठाम, राज्य शासनाचा जीआर अमान्य; संप अधिक चिघळण्याची शक्यता

गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !

 

 

 

Comments are closed.