Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली व अहेरी आगारातील ६५० कर्मचारी संपावर !

एसटी कर्मचाऱ्यांचा ११ व्या दिवशीही संप सुरु असून दोन कोटीचे महसूल बुडाले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :  जिल्ह्यातील अहेरी व गडचिरोली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोंबरपासून एसटी महामंडळाच राज्य शासनात विलनीकरण करावे तसेच इतर मागण्यासाठी संप पुकारला असून सलग ११ व्या दिवशीही संप सुरूच आहे.

संपामुळे अहेरी व गडचिरोली आगाराचे ११ दिवसात सुमारे दोन कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. याशिवाय अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त दुर्गम भागात जाणारी लालपरी बंद झाली असल्याने गाव खेड्यातून जीवनावश्यक वस्तूंचे खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येऊन खरेदी करावे लागते. मात्र ये-जा करण्यासाठी लालपरीचे कर्मचारी संपावर गेले असल्याने दुर्गम भागातील नागरिकांनाही याचा फटका बसला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनाचे कृती समिती तयार करून त्या समितीच्या नेतृत्वात २८ ऑक्टोंबर पासून सुरुवात केली आहे. काही मागण्या मान्य झाल्यानंतरही संप मागे घेण्यात आला होता मात्र, विलनीकरणाच्या मागणीला पुन्हा ३० ऑक्टोंबर पासून संपाला सुरुवात झाली असून संप अजूनही कायम आहे.

यामुळे जिल्ह्यामध्ये दर दिवशी ५५० फेऱ्या राहत असतात. यातून आणि दिवाळीचा हंगाम सुरु असल्याने अधिकचे उत्पन्न मिळण्याची संधी होती. मात्र संपामुळे हि संधी गमावली असून ११ दिवसापासून एसटी वाहने आगारातच थांबली असून कर्मचारी गडचिरोली अहेरी बसस्थानकासमोर एसटी महामंडळाच राज्य शासनात विलनीकरण होत नाही तोपर्यंत संपावर कायम राहणार असून वेळ आली तर परिवारासह आत्मदहनही करणार असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

एसटी कर्मचारी संपावर ठाम, राज्य शासनाचा जीआर अमान्य; संप अधिक चिघळण्याची शक्यता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थी दिवस साजरा

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

 

 

Comments are closed.