Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक कार्यकर्तीच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

४ मुलींसह ३ ग्राहकांना पोलिसांनी केली अटक.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वृत्तसंस्था, दि.०८ नोव्हेंबर :  मध्य प्रदेशातील सिहोर मध्ये सामाजिक कार्यकर्ती महिला अनुपमा तिवारी यांच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला असून पोलिसांनी महिला मॅनेजर आणि तीन ग्राहकांसह सहा जणांना अटक करून  घरातून रोख रक्कमही जप्त केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महिलेच्या घरात हे सेक्स रॅकेट उघडकीस आले ती स्वत:ला सामाजिक कार्यकर्ती असल्याचं सांगत असले तरी ते एका राजकीय पक्षाशी निगडीत असून  त्यांनी मागे नगराध्यक्षपदाची पण निवडणूक लढवली आहे.

पोलिसांना सेक्स रॅकेटची गुप्त माहिती मिळताच केला  सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सेक्स रॅकेट संदर्भात पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस सिहोर बसस्थानकाजवळ असलेल्या अनुपमा घरी पोहोचले. छाप्या दरम्यान त्या ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिस आल्यानंतर तेथून कोणीही पळून जाण्यात यशस्वी झाले नाही.

सामाजिक कार्यकर्ती महिलेच्या घरातून पोलिसांनी चार मुली आणि तीन ग्राहकांना अटक केली. यासोबतच तेथून अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. पकडलेल्या सर्व मुली भोपाळ जवळच्या रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, इंदुलता नावाच्या महिला मॅनेजर सर्व मुलींना सामाजिक कार्यकर्ती महिला अनुपमा तिवारी यांचे घरी पोहचवत होती. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ती  अनुपमा तिवारी यांच्या घरातून २८ हजार रुपयांसह दोन कारही जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ती अनुपमा तिवारी यांनी २०१५ साली एका राजकीय पक्षाच्या तिकिटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. नेहरू युवा केंद्रातर्फे त्यांना काही वर्षांपूर्वी योगाचार्य म्हणून गौरविण्यातही आले आहे. अनुपमा तिवारी यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक विधाने केली होती. त्यांनी महिलेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता त्याच्या घरातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा 

एसटी कर्मचारी संपावर ठाम, राज्य शासनाचा जीआर अमान्य; संप अधिक चिघळण्याची शक्यता

सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी

विहिरीत पडलेल्या वाघाला बाहेर काढण्यात वन विभागाला यश

Comments are closed.