Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. ५ फेब्रुवारी : आलापल्ली-चंद्रपूर महामार्गावर आज सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लगाम-धनुर वळणावर ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक बसल्याने अल्टो कारमधील चार युवक गंभीर झाल्याची घटना घडली आहे. या धडकेत गंभीर जखमी झालेल्याची नावे रणजीत दुर्गे, चेतन, अमरदीप, मारोती असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर नंदी, बांधकाम कंत्राटदार यांच्यामार्फत धनुर वनामध्ये लोखंडी मचाण (Fire Watch Tower) चे काम करण्यासाठी मुल येथील कामगारांकडून मचाण बनविण्याचे काम करण्यात येत होते. संध्याकाळ झाल्याने काम आटोपोवून लगामकडे जात असतांना धनुर-लगाम च्या वळणावर आलापल्ली कडून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कारचा चकनाचूर झाला असून कारमधील चार युवक गंभीर झाल्याने त्यातील एक चेतन नामक (कारचालक) यास उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले. तर वाहनचालकाच्या बाजूला बसलेले रणजीत दुर्गे व मागील सीटवर बसलेले अमरदीप व मारोती नामक यांना ग्रामीण रुग्णालय, आष्टी येथे दाखल केले. मात्र त्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे रवाना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे सर्व कामगार मुल, बेंबाळ येथील असल्याची माहिती असून घटनेची माहिती असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.