Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

17 ठिकाणी चोरी करणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहमदनगर, दि. २८ फेब्रुवारी :  जिल्ह्यातील १७  ठिकाणी जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून एकूण २३ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या आरोपींनी श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी, शेवगांव आणि राहुरी परिसरामध्ये जबरी चोऱ्या आणि घरफोडया केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. ही टोळी दुपारच्या वेळी कोणी नसलेल्या घरावर पाळत ठेऊन दुपारीच घरफोडी करत होती. चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपींकडून ४२ तोळे सोने- चांदीचे दागिने, तीन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा ; शेतकरी कामगार पक्ष

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.