Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांकडून, खासदार सुप्रिया सुळे यांचे विविध पुस्तके भेट देऊन स्वागत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, ता. 8 जून 2022 : राजकारण हा आपला अविभाज्य अंग असला तरी त्यातून समाजकारण किती करता येईल, यातून समग्र विचार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे गडचिरोली शहराध्यक्ष विजय गोरडवार यांनी केलेले सादरीकरण प्रेरणादायी आहेत, असे कौतुकास्पद उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

मंगळवार, दिनांक 7 जून रोजी खासदार सुप्रिया सुळे या गडचिरोलीत आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक सर्किट हाऊसमध्ये त्यांची भेट घेत आपले विचार व्यक्त केले. त्यावर खासदार सुळे यांनी गोरडवार यांचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मला पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊ नका, असा आग्रह धरणाऱ्या खासदार सुळे यांचा सन्मान करण्यासाठी गोरडवार यांनी त्यांना विविध महापुरुष मंडळींची पुस्तके भेट स्वरूपात देऊन त्यांचं स्वागत करून,त्यानंतर स्थानिक परिस्थिती, आगामी निवडणूक, पक्ष संघटना आणि शहर विकास आराखड्याचे नियोजन या बाबत त्यांनी संवाद साधला. यावेळी अमोल कुळमेथे, अमर खंडारे, प्रसाद पवार, माजी नगरसेविका संध्या उईके, मीनल चिमुरकर, महिला तालुकाध्यक्ष नीता बोबाटे, रेखा कोराम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिव्यांगांसाठी सामाजिक बांधिलकीतून काम करावे – खासदार, सुप्रियाताई सुळे

भारताच्या संसद भवन साठी वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून दर्जेदार सागवान इमारत लाकूड खरेदी

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.