Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारताच्या संसद भवन साठी वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून दर्जेदार सागवान इमारत लाकूड खरेदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
  • वन विकास महामंडळात दर्जेदार सागवान इमारत उत्पादन होत असल्याने व तो साग इमारत संसद भवन साठी वापर होत असल्याने ही महामंडळासाठी अभिमानास्पद बाब.
  • एका दिवसात ऑफलाइन लिलावात 12 करोड रुपयांचा वनउपज विक्री. 

चंद्रपूर, दि. ७ जून : वन विकास महामंडळात च्या अंतर्गत बल्लारशा आगार विभागातून दिल्ली येथे सुरू असलेले central विस्टा प्रोजेक्ट संसद भवन बांधकामाकरिता विक्री आगारातून आजतागायत जवळपास 300 घनमीटर सागईमारत खरेदी केलेली आहे. परत याच कामाकरिता अजून साग इमारत मालाची मागणी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रात वन विकास महामंडळ हे शासनाचे अंगीकृत व्यवसाय आहे. महामंडळात दर्जेदार सागवानाची निर्मिती करून त्याची विक्री केली जाते. वनविकास महामंडळाचे दर्जेदार सागवान भारताच्या संसद भवनासाठी त्याचा वापर होत असल्याने ही बाब महामंडळासाठी गौरवास्पद आहे.

दिनांक 7 जुन 2022 रोजी महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून जाहीर लिलावात फायनल फिलिंग दर्जेदार सागाची विक्रमी विक्री करून महामंडळाला एका दिवसात 12 करोड रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. आज रोजी या विक्री आगारातील जाहीर लिलावाला व्यवस्थापकीय संचालक वासुदेवं यांनी भेट दिली. बल्लारशा विक्री आगारात मोठ्या प्रमाणात देशभरातून तसेच राज्यातून व्यापारी वर्ग उपस्थित होता. जम्मू कश्मीर, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश इत्यादी राज्यातूनही व्यापारी वर्ग उपस्थित होते. या व्यापारीवर्ग सोबत वासुदेवन यांनी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्याचे निराकरण केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनविकास महामंडळाच्या बल्लारशा विक्री आगारातून सन 2022/23 या वर्षात 165 करोड रुपयांचा वनउपज विक्री झालेली असून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे. ऑफलाइन लिलावात जवळपास 100 करोड रुपयाचा महसूल प्राप्त झाला आहे. या लिलावातून साग इमारत प्रति घनमीटर 2 लाख 71 हजार रुपये असा highest दर प्राप्त झाला आहे.

वन विकास महामंडळात वासुदेवं व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाल्या पासूनच महामंडळात अनेक नवीन उपक्रम व दर्जेदार साग विक्रीतून महामंडळाला अधिकाधिक महसूल प्राप्त होईल. असे प्रयोग करून महामंडळाचे प्रगतीचे कार्य केले आहे. महामंडळात 2021/22 या वर्षात विक्रमी महसूल प्राप्त झाल्याने वासुदेवन यांनी याचे सर्व श्रेय महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे श्रम असल्याचे म्हटले आहे.

आज झालेल्या लिलावात चंद्रपूर चे प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार (IFS) तसेच साहाय्यक व्यवस्थापक गणेश मोटकर, कदम, कुरेशी, इत्यादी अधिकारी-कर्मचारी यांनी श्रम घेऊन महामंडळाला महसूल प्राप्त होईल असे कार्य केले आहे.

हे देखील वाचा : 

श्रमजीवीने केले आरोग्य व्यवस्थेचे ‘पोस्टमार्टेम’

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन युवक-युवतींसाठी मोफत MS-CIT प्रशिक्षण

Comments are closed.