Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्याचा मुलगा झाला तहसीलदार ; बळीराजाच्या कष्टाचे चीज झाले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रोहा, 25 नोव्हेंबर :- सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुंभार गावच्या राजेंद्र कांतीलाल देशमुख यांचे अत्यंत साधं आणि सरळ व्यक्तिमत्व. पेशाने शेतकरी, पण निसर्गाच्या वेळोवेळी पाठ फिरवल्याने उत्पन्नाच्या ऐवजी पदरी नेहमीच अपयश .मग शेतीबरोबर जोडधंदा म्हणून भाजी विकण्याचा निर्णय घेतला.ऊन-तहान या कशाचाही विचार न करता कधी बाजारात बसून तर कधी दारोदार फिरून भाजी विक्री केली . त्यांच्या पदरी दोन मुलं. दोघांनाही शिक्षण घेताना कशाचीही कमतरता भासू नये म्हणून जीवाचे रान करणारा हा बाप आज खरच, या जगात एक यशस्वी बाप ठरला .पण आई-वडिलांनी नुसते कष्ट करून चालत नाही तर मुलेही तेवढीच जिद्दी असायला हवीत. त्यांच्या नशिबाने मुलेही अगदी गुणी निघाली .आणि मग काल देशमुख कुटुंबाचा सोनेरी दिवस उजाडला. यांचा पुत्र “महेश राजेंद्र देशमुख” याची काल ‘कर सहाय्य करनिरीक्षक’ म्हणून निवड झाली. खऱ्या अर्थानं बळीराजाच्या कष्टाच चीज झालं.

आज केवळ महेश साहेब झाला नाही, तर राजेंद्र देशमुखांच्या प्रामाणिक कष्टाला यश मिळाले. मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करणारा असा हा बाप प्रत्येक मुलाला मिळो. आणि आई बापाच्या कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास करून यशाला गवसणी घालणारा असा हा मुलगा प्रत्येक आई-वडिलांच्या नशिबाला येवो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

प्रति थेंब अधिक पिक (सुक्ष्म सिंचन) योजने अंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी करणेबाबत

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक चेंबूर पोलिसांची लक्षणीय कामगिरी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.