Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसी समाजाला न्याय मिळणे ही आनंदाची गोष्ट असेल – चंद्रशेखर बावनकुळे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. ८ फेब्रुवारी : सरकार आणि ओबीसी आयोगाने योग्य पद्धतीने संपूर्ण बाजूही ही सुप्रीम कोर्टात मांडली पाहिजे. सर्व ओबीसी नेत्यांनी आणि मंत्र्यांनी एकत्र येऊन योग्य पद्धतीने वकिलाशी चर्चा करून उच्च स्तरीय वकील लावून सर्वोच्च न्यायालयाला प्रेझेंटेशन केलं पाहिजे. मी देखील या प्रकरणात आपली भूमिका कोर्टात मांडणार आहे. निश्चितपणे हे प्रकरण आता अंतिम होईल आणि ओबीसींना न्याय मिळेल. ओबीसी समाजाला न्याय मिळणे ही आनंदाची गोष्ट असेल असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका आजपासूनच्या पुढच्या निवडणुका मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल त्याच्या आधारावर घ्याव्या त्यापूर्वी निवडणुका लावू नये ही आमची विनंती राहील असेही बावनकुळे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही – अजित पवार यांची केंद्र सरकारला कोपरखळी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा – पंकजा मुंडे

 

 

 

 

Comments are closed.