Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमात प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली जनसुनावणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव, दि. ८ फेब्रुवारी : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेतली आहे. यावेळी अनेक तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या असून महिलांच्या तक्रारी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या ऐकून घेत असून अधिकाऱ्यांना निपटारा करण्याचा यावेळी सूचना दिल्या आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती. राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या २०  मुलांना ५ लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. ५६९  महिलांना लाभ देण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय जिल्ह्यात २० बालविवाह रोखण्यासाठी कारवाई देखील संबंधित विभागाकडून करण्यात आली. हे कार्य कौतुकास्पद आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा अमलबजावणी केली जावी असेही महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही – अजित पवार यांची केंद्र सरकारला कोपरखळी

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

 

 

Comments are closed.