Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही – अजित पवार यांची केंद्र सरकारला कोपरखळी

बीड जिल्ह्याच्या विकासात निधी कमी पडू देणार नाही...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड, दि. ८ फेब्रुवारी : केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे तो राज्याला नाही त्यामुळं निधीकाटकसरीने वापरा अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. बीड मतदारसंघातील शंभर कोटीचा विकास कामाच्या प्रसंगी ते ऑनलाइन बोलत होते पुढ बोलताना ते म्हणाले की बीड जिल्ह्यात विकास कामांच्या प्रकल्पांना यापुढे निधी कमी पडू देणार नाही, जनतेचा पैसा आहे दर्जेदार कामे करा असे सांगितले बीड विधानसभा मतदारसंघात १०० कोटी ६० लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा व्हर्च्यूअल माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे ऑनलाईन उपस्थित होते तर बीडच्या व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसट, पंचायत समिती सभापती सारिका गवते, माजी आमदार अमरसिंह पंडित जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी धनंजय मुंडे यांनी विकास आम्हाला बीड चा करायचा आहे असे स्वप्न आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पाहत आहोत दादा आम्हाला मदत करा असे धनंजय मुंडे म्हणाले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

 

 

 

 

Comments are closed.