Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

...त्या शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा - पंकजा मुंडे. असा त्यांचा काळात ३०२ चा गुन्हा दाखल झाला असेल तर निश्चित केला पाहिजे - धनंजय मुंडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ८ फेब्रुवारी :  वाळू माफियांच्या उच्छादावरून आता मुंडे बहीण भाऊ आमने सामने आले आहेत. बीडच्या शहाजानपूर चकला गावातील ४ शाळकरी मुलांचा सिंदफना नदीत, वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. तर यावर पंकजा मुंडेंकडून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. तर तुमच्या काळात जर अशा स्वरूपात गुन्हा दाखल झाला असेल तर मीही करतो. असं म्हणत धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंच्या मागणीवर प्रतिसवालरुपी प्रतिक्रिया दिलीय.

याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या, गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे. सत्ताधारी किंवा प्रशासन त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने, त्यांचे धारिष्टय वाढले आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना अतिशय संतापजनक आहे. प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर याविषयी धनंजय मुंडे म्हणाले, की असा यापूर्वी जर त्यांच्या काळात ३०२ चा गुन्हा दाखल झाला असेल, तर तो केलाच पाहिजे. आता तो खड्डा कोणी केलाय हे पाहावं लागेल. का ३०२ गुन्हा त्या खड्ड्यावर करायचा का? असा सवाल देखील पंकजा मुंडे यांच्या मागणीवरून धनंजय मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरू असताना, दिवसेंदिवस वाळू माफियांमुळं सर्वसामान्यांचे बळी जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे गोदावरी नदीसह सिंदफणा नदीतिल देखील जिओ मॅपिंग व्हावी. अशी मागणी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडून करण्यात आली होती. तर आता वाळू माफियांवर गुन्हा दाखल करावा. या मागणीवरून मुंडे बहिण भाऊ आमने सामने आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा – पंकजा मुंडे

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

 

 

 

Comments are closed.