Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा – पंकजा मुंडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड, दि. ८ फेब्रुवारी : नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या घटनेस सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या कांही महिन्यांपासून जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे. सत्ताधारी किंवा प्रशासन त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने त्यांचे धारिष्टय वाढले आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना अतिशय संतापजनक आहे, प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे ? असा सवाल करत पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मृत्यु झालेल्या त्या मुलांच्या कुटुंबियाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! माय लेकीला बेदम मारहाण करुन घरातील दागिने, रोकड घेऊन चोरटे झाले पसार..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भीषण अपघात: दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक, धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

हिजाबच्या निर्णयाविरुद्ध एल्गार… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती रस्त्यावर..

 

Comments are closed.