Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उत्तम वैद्यकीय सुविधा काळाची गरज : आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कोथरुडसाठी मोफत फिरता दवाखाना उपक्रमाचे लोकार्पण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे डेस्क, दि. ८ फेब्रुवारी : कोरोना जागतिक महामारीच्या संकटातून आता आपण बाहेर पडत आहोत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कोथरुडसाठी लोकसहभागातून आ. पाटील यांनी मोफत फिरता दवाखाना उपक्रम सुरू केला असून, त्याचे लोकार्पण मोरे विद्यालय येथील केळेवाडी येथे झाले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका छायाताई मारणे, वासंती जाधव, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, अल्पना वर्पे, स्विकृत सदस्या अॅड मिताली सावळेकर, भाजपा कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा ऐडके, अजय मारणे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आ. पाटील म्हणाले की, कोविडमुळे आपल्याला सर्वांना आरोग्य व्यवस्थेची गरज प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे आगामी काळात उत्तम आरोग्य व्यवस्था ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असेल. कोविडनंतरच्या काळात कोथरूड मतदारसंघातील संघातील नागरिकांसाठी डॉक्टर आपल्या घरी सारखा उपक्रम राबविला. ज्यातून सोसायटी भागातील नागरिकांना एका फोन कॉलवर मोफत वैद्यकीय सुविधा पुरविल्या. त्याचप्रमाणे वस्ती भागातील नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना उपक्रम ही संकल्पना पुढे आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ते पुढे म्हणाले की, हा मोफत फिरता दवाखाना दैनंदिन वेळापत्रकानुसार वस्ती भागात जाऊन, वस्ती भागातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन, आवश्यकतेनुसार औषधोपचार पुरविले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी वस्ती भागातील या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप बुटाला यांनी केले. ते म्हणाले की, “माननीय चंद्रकांतदादांचा प्रत्येक उपक्रम हा दूरदर्शी असतो.‌ डॉक्टर आपल्या घरी हा उपक्रम असाच होता, ज्याचा लाभ सोसायटी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आता वस्ती भागातील नागरिकांना ही उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी माननीय दादा प्रयत्नशील असून, त्यासाठी मोफत फिरता दवाखाना हा उपक्रम सुरू केला आहे.” यावेळी स्थानिक नगरसेविका छाया मारणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! एक लाख रुपयांसाठी आईनेच विकले पोटच्या मुलाला  

शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा – पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

 

Comments are closed.