Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सशस्त्र सीमा बलाचे सुपुत्र जवान अमोल पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नाशिक, दि. १६ जानेवारी : बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी दि. १४ जानेवारी रोजी सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरू होते . दरम्यान, ११ केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. त्यात बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक येथील अमोल हिंमतराव पाटील (वय ३०) यांचा समावेश आहे.

प्रशिक्षण मैदानावरील टेन्ट काढण्यासाठीचे काम शुक्रवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास सुरू होते, ज्या ठिकाणी हे काम सुरू होते त्या प्रशिक्षण केंद्राच्या वरून जाणाऱ्या अकरा हजार उच्चदाब प्रवाहाच्या तारांशी संपर्क आल्याने एकच हलकल्लोळ उडाला, त्यात दहा जवान भाजले गेले, सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली. यात तिघांचा मृत्यू झाला, त्यात अमोल पाटील यांच्यासोबत परशुराम सबर (वय २४) व महेंद्रकुमार बोपचे (२८) यांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ४ गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे, प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा व खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहूनही वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

जवान अमोलच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली, सशस्त्र सीमाबलाच्या बिहार – नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होता, ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेला असताना केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे अमोलची सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात निवड झाली होती, नुकताच दिवाळीत अमोल बोलठाण येथे सुटीवर आला होता, या वेळी कन्यारत्न झाल्याचा आनंद सोहळा गावात स्नेहीजनांसोबत साजरा झाला. जाताना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकलीला सोबत घेऊन गेला होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तारुण्यात वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोलच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे, अमोलचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून, केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांच्या अधीन राहून त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.

हे देखील वाचा : 

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थविरोधी जनजागृती; 34 पान टप-यांवर करण्यात आली कारवाई

पोलीसांची अब्रू चव्हाट्यावर! रिक्षा, जीप चालकाकडून अव्वाच्या सव्वा रुपये हप्ता घेणाऱ्या पोलीसचा व्हीडिओ झाला व्हायरल…

अल्पवयीन मुलीचं गर्भपात प्रकरण : आर्वीच्या डॉ. कदम हॉस्पीटलच्या झडतीत मिळाली काळविटाची कातडी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.