Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील धक्कादायक घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

डोंबिवली, दि. ९ फेब्रुवारी :   ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका तरुणाने आपल्या पत्नीवर चाकुने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सोमनाथ देवकर (४५) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीला मंगळवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बेदम मारहाण केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिला पतीविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी रिक्षात बसल्या असता यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या सोमनाथने पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिच्या मानेच्या खाली, पायावर आणि हातावर चाकुने सपासप वार केले आहेत. पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर आसपासच्या लोकांनी तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल केलं.

या घटनेनंतर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पती पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी चारित्र्य आणि चोरीच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपीनं पत्नीला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे पीडित महिला फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिच्यावर धारदार चाकुने सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

धनंजय मुंडे यांचा लग्नामध्ये भन्नाट डान्स; विडिओ तुफान व्हायरल  

उत्तम वैद्यकीय सुविधा काळाची गरज : आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.