Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गझल अमृत दिवाळी अंकाचे प्रकाशन

कोरपनात रंगले कवी संमेलन..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 चंद्रपूर दि,०३ नोव्हेंबर : गझल मंथन साहित्य संस्था ,कोरपना च्या वतीने गझल अमृत दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक २ नोव्हेंबरला स्व भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येथे पार पडला.

या प्रकाशन सोहळयाला उद्घाटक चिमूर येथील  गटविकास अधिकारी धनजय साळवे , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर, तर विशेष अतिथी डॉ. किशोर कवठे, स्व. संगीता चटप आश्रम शाळाचे प्राचार्य मारोती जूनगरी, स्व.भाऊराव चटप आश्रम शाळा चे मुख्यद्यापक डी एम आडकिने , गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव जयवंत वानखडे,सामाजिक कार्यकर्ते विशाल गज्जलवार , नितीन बावणे, डॉ.दीपक मेश्राम , ओम पवार,प्रा.अरुण कुकडे, डॉ.प्रकाश खणके, जयंत जेनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन केले. गझल अमृत विशेषांकात चांदा पासून ते बांद्यापर्यंतच्या २६० गझलकाराच्या गझली यात समाविष्ट असून  या कार्यक्रमात कवी संमेलन हि ठेवण्यात आले होते .यामध्ये  पन्नासपेक्षा जास्त कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मेंद्र मेश्राम, संचालन नरेश बोरीकर तर आभार प्रशांत रामगिरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनुप रणदिवे , महेश गारघाटे, प्रज्योत आवारी , विपुल साळवे , कुशाब मालेकर,भूषण तुरनकार, अनुपम ठाकरे, प्रमोद रामगिरवार आदींनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

मालदीव येथील शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ नागनाथ पाटील यांची निवड

‘आरपार’ आत्मचरित्र वाचून दु:खाला पार करून ध्येयाचा सार गाठता येईल – गोविंद नांदेडे

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.