Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मालदीव येथील शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ नागनाथ पाटील यांची निवड

लोकस्पर्श न्यून नेटवर्क

हिंगोली, दि. ३ नोव्हेंबर : जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांची 22 जानेवारी 2022 मध्ये मालदीव येथे होत असलेल्या शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठवाड्याला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे. डॉ नागनाथ पाटील हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील योगानंद स्वामी कला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.

डॉ पाटील यांनी लंबाड़ी , कोंडणातलं जीणं, हुतराणी या कादंबरीसह, आदिवासी आणि ग्रामीण जीवन अधोरेखित करणारे वास्तवदर्शी साहित्य लेखन केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रानभुल, मँपको हे कथासंग्रह तर खोल दोहातील सावल्या, सावली हरवलेलं झाड हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच अर्वाचीन मराठी कवितेचे संपादन सुद्धा त्यांनी केलेले आहे.

मराठवाड्यातील मराठी कविता एक विवेचक अभ्यास यावर डॉ नागनाथ पाटील यांचे संशोधन आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांच्या लंबाड़ी या कादंबरीस अखिल भारतीय मराठी वाङमय परिषद बडोदा गुजरात सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला असून चिकलठाणकर पुरस्कार, कोल्हापूर येथील वारणेचा वाघ पुरस्कार, मॅपको कथासंग्रहास
नरहर कुरुंदक़र उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद ने दिला आहे तसेच ” अबील खिचडा ” या कथेस धुळे येथील अखिल भारतीय आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार तर ” माय ” या कथेस सांगली येथील अखिल भारतीय आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. नागनाथ पाटील यांचे बरेचसे साहित्य अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेले आहे.

हे देखील वाचा :

डिझेल १० रुपयांनी तर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

तब्बल १३ लाख किंमतीचा मुद्देमाल केला लंपास ! दिवाळी आधी गिफ्टच्या दुकानात चोरी !

‘जय भीम’ चित्रपटातील दृश्यावरुन वाद

 

Comments are closed.