Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! २० वर्षीय मुलीवर अत्याचार करून केली हत्या!

मुंबईतल्या कुर्ल्यातील धक्कादायक घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २७ नोव्हेंबर : मुंबईतल्या कुर्ल्यातील एका २० वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही इमारत नेहमी बंद असते. एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला असता त्यावेळी सर्वप्रथम त्याने हा मृतदेह पाहिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याने लगेच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे.

या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात बलात्कारासह हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

जागेच्या वादावरून काठीने मारहाण झाल्याने उपसरपंचाचा मृत्यू…

गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली दोन ट्रक्टरची जाळपोळ ..

गडचिरोली जिल्हयातील ९ नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.