Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयातील ९ नगर पंचायतीमध्ये आदर्श आचार संहिता लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये गडचिरोली जिल्हयातील मुदत समाप्त झालेल्या नगरपंचायती मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२१ परिशिष्ट-१ प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

त्यात गडचिरोली जिल्हयातील ९  नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुक नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, मुलेचरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची येथे आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवडणूक आयोगाच्या आदेशातील परिशिष्ट-१ मधील टप्यानुसार नगरपंचायतींचे सार्वत्रिक निवडणूकीचा शेवटचा टप्पा मतमोजणी दिनांक २२ डिसेंबर, २०२१ ( बुधवार) रोजी पार पाडण्यात येणार असून उक्त आदेशाच्या परिच्छेद ७ नुसार निवडणूकीची आचारसंहिता आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक २४ नोव्हेंबर, २०२१ पासून ते निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे.

आचार संहिता ही सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संपूर्ण संबंधित नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागू राहणार असून क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्रसुध्दा करता येणार नाही. असे निर्देशित केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

धक्कादायक! एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बनवलं शिकार

धक्कादायक!! एका अल्पवयीन आईने ४०दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून केली हत्या!

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान

 

 

Comments are closed.