Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संताच्या आचरणातील एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा ; कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे

गोंडवाना विद्यापीठात संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

गडचिरोली, दि:१५ : संतांचे नाव समाजाच्या अंतरंगात खोलवर दडलेले असते.कोणी त्यांची निस्वार्थ सेवा केली तर कोणी त्यांच्या आदर्शावर चालून समाजाला दिशा मिळेल . एक दिवस स्मरण करून त्यांचे आदर्श विसरून जाणे हे बरे नाही. प्रत्येकाने हा विचार करून त्यांचे चरित्र वाचून त्यांच्यातला एक तरी गुण आपल्या अंगी बाळगावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी श्री .सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त केले.
यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . श्री सेवालाल महारांजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ.अनिल चिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रा. डॉ.नंदकिशोर मने यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा ,

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

Comments are closed.