Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

नक्षल्यांनी पूरुन ठेवलेले स्फोटक साहीत्य हस्तगत करण्यात आले.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १४ फेब्रुवारी: गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी नक्षल्यांनी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा हस्तगत करण्यात पोलीस जवानांना यश प्राप्त झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो.

दिनांक १४/०२/२०२३ रोजीचे ११:३० वा. चे दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत येत असलेल्या पोमकें कटेझरी हद्दीमध्ये कटेझरी-चारवाही जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले असल्याच्या खात्रीशीर ख़बरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाचे जवान व बीडीडीएस पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जवानांना जंगलात एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेले स्फोटके व इतर साहीत्यांचा साठा मिळुन आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळुन आलेल्या साठ्यामध्ये २ नग जिवंत ग्रेनेड, २ नग ग्रेनेड फायर कफ, १८ नग वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लॅस्टीक डब्बा (टुल किटसह), ४ नग वायर कटर, ७ नग ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ नग लहान लोखंडी आरी, २० नग नक्षल पुस्तके, ७ टु-पीन सॉकेट, १ स्टील डब्बा झाकणी व २ नग प्लॅस्टीक झिल्ली इ. नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले. २ नग ग्रेनेड हे बीडीडीएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवर नष्ट करण्यात आले असून, घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन पुढील कारवाई सुरु आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी), यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात पोमकें कटेझरीच्या जवानांनी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा : 

गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा : अन्यथा मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार

आलापल्ली येथील ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडियम स्कुल, तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते.

Comments are closed.