Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने केला क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. १४ फेब्रुवारी: एक महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गडचिरोली पोलीस दलाने मेहतर कुवरसिंग कचलाम यांच्या क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस केला आहे. 

पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत दिनांक ०८/०१/२०२३ रोजी मौजा देवसुन कटेझरी जाणाऱ्या रोडवर सुमारे ५५ किलोमीटर पूर्व दिशेला एक अनोळखी मृतदेह मिळुन आला होता. त्यास ग्रामीण रुग्णालय, कोरची येथे उपचारकामी दाखल केले असता, मा. वैद्यकिय अधिकारी यांनी तपासुन त्यास मृत घोषीत केल्याने, पोस्टे कोरची येथे मर्ग क्र. ०३ /२०२३ दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोउपनि नरेश वाडेवाले करीत होते. सदरचा मृतदेह हा मृतक नामे मेहतर कुवरसिंग कचलाम, वय ५५ वर्षे, रा. पौरखेडा, तह. दुर्गकोंदल, जि. कांकेर (छत्तीसगड) याचे असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परंतू या मृत्यू बाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका असल्याने त्यांनी मर्गबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांना दिले.

यावरुन एक महीण्याच्या अथक परिश्रमानंतर सखोल चौकशीअंती हा मर्ग नसुन, खून असल्याचे उघडकीस आल्याने संशयीत आरोपी नामे १) मुकेश बुधरुराम यादव, वय ३६ वर्षे, व्यवसाय फॉरेस्ट गार्ड, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर – मोहला चौकी (छत्तीसगड), २) सौरभ राजेंद्र नागवंशी, वय २७ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. मानपूर, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), ३) रुपसिंग बाबुराव तुलावी, वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड), ४) आसुराम देवजी तुलावी, वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. आमाकोडो, तह. मानपूर, जि. – मानपूर मोहला चौकी (छत्तीसगड) यांनी संगनमत करुन कट रचुन मृतक मेहतर कुवरसिंग कचलाम यास पैसे परत न केल्याच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने बळजबरीने चारचाकी वाहनाने पळवून नेवुन त्यास मारहाण करुन जिवानीशी ठार केले तसेच मृतकाची मोटरसायकल हिचे चेसीस नंबर घासुन पुरावा नष्ट करुन घटनास्थळावर आणून टाकल्याचे सांगीतले. त्यावरुन गडचिरोली पोलीस दलाने वरील आरोपीतांवर पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. १३/२०२३, कलम ३०२, ३६४, १२० (ब), २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असुन, त्यांना अटक करण्यात आली व सदर अटक आरोपीतांना मा. न्यायालयापुढे हजर केले असता, मा. न्यायालयाने चारही आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा, साहील झरकर हे करीत आहेत.

हे देखील वाचा: 

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

 

आलापल्ली येथील ग्रीनलँन्ड इंग्लिश मिडियम स्कुल, तालुका विज्ञान प्रदर्शनी आयोजन करण्यात आले होते.

 

Comments are closed.