Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा आज संपन्न ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर, दि. २३नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्निक केली. पहाटे अडीच वाजता शासकीय पूजेला सुरुवात झाली.या दोन्ही दाम्पत्यांकडून विठुरायाची साग्रसंगीत महापूजा झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी विठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहू देत, सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाचरणी केली. तर आज पुन्हा एकदा सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्याचेही त्यांनी म्हटले. यानंतर ७३ कोटी रुपयांच्या पंढरपूरच्या मंदिर विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत , कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठल स्तुतीच्या अभंगाच्या गजरात विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाख भाविक दाखल झाले आहेत. टाळ मृदुंगात होणारा हरिनामाचा गजर, भगव्या पताका, सगळीकडे वारकरी भक्तांची रेलचेल अशा भक्तिमय वातावरणात सध्या पंढरपूर गजबजलेले आहे. एकादशी निमित्त पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार ; आदित्य ठाकरे यांचा दावा

 

अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम भारतमातेच्या चरणांशी समर्पित – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 

अहेरीत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.