Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

सांगली, दि. २८ जुलै : नजिकच्या सांगलीवाडी या ठिकाणी कृष्णेच्या पात्रातुन बाहेत आलेल्या एका महाकाय मगरीला पकडण्यात आले आहे. नदीकाठच्या असणाऱ्या दफनभूमी शेजारी १२ फूट मगर आढळून आली. यानंतर नागरिक आणि प्राणी मित्रांनी या मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. तर या अजस्त्र मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सांगलीच्या कृष्णाकाठचा महापूर ओसरू लागल्यानंतर आता पात्रातल्या मगरींचा वावर ठीक-ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशीच एक महाकाय मगर सांगलीवाडी नजीक कृष्णाकाठी आढळून आली आहे. नदीकाठच्या असणाऱ्या मुस्लिम समाजाच्या दफनभूमी शेजारी ही भली मोठी मगर काही नागरिकांना दिसून आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यानंतर येथील तरुणांनी प्राणी मित्रांना बोलावून या मगरीला अथक प्रयत्नानंतर पकडण्यात आले. जवळपास बारा फूट इतकी लांब आणि महाकाय अशी ही मगर आहे. ही अजस्त्र मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. तर या मगरीला पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वन विभागाच्यावतीने कृष्णाकाठी नागरिकांनी पुराच्या पाण्यामध्ये जात असताना काळजी घ्यावी, जर मगर दिसल्यास तातडीने संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबियाचे अश्रू अनावर

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.