Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी कराटे डोजोचे बेल्ट ग्रेडिंग परीक्षेत कराटे पट्टुनंचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : अहेरी राजनगरीत सुरु असलेल्या मागील 33 वर्षापासून च्या कराटे मार्शल आर्ट डोजो मध्ये विदर्भ महाराष्ट्र अहेरीत मिळालेल्या कराटे परीक्षा केंद्र 2021 अंतर्गत दि विदर्भ रिजन कराटे-डो असोसिएशन संलंग्नित दि गडचिरोली डिस्ट्रीक कराटे-डो असोसिएशन अहेरी जिल्हा गडचिरोल्ली या शासनमान्य संस्थेद्वारा, विर ब्रम्हन्गारू मंदिर संस्थान चे भव्य पटांगणावर आयोजित होती.

यात अहेरी कराटे डोजोचे 43 कराटे पट्टनी प्रथम येल्लो बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्राऊन बेल्ट परीक्षेकरिता पारिश्रमिक परीक्षा दिली ज्यात प्रथम दिवस थेअरी पेपर , द्वितीय दिवस बेसिक फिजिकल व तृतिय दिवस काता व कुमिते ग्रेड अश्या परीक्षा नियोजनात सहभाग घेऊन आपले गुण कौशल्य दाखविली व ए ग्रेड व ए प्लस ग्रेड मध्ये परीक्षा उतीर्ण केली यात कराटे पट्टुनी कठीण परिश्रम केले कराटे डिग्री प्रमाणपत्र प्राप्त केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि परीक्षा संस्थेचे सचिव तथा वर्का अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट व राष्ट्रीय पदक विजेते प्रा.सेन्साई रवि भांदककार याच्या मार्गदर्शनात दिनांक 22,23 व 27 जुलै 2021 रोजी पार पडली यात सर्व कराटे पट्टु काता व कुमिते मध्ये उत्तुंग सराव करीत असून शासनाच्या शालेय क्रीडा व शासन मान्य असोसिएशनच्या जिल्हा ते राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धान करिता तत्पर आहेत.

यात प्रामुख्याने खालील कराटे पट्टुनी येलो बेल्ट पदवी प्राप्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जागृती बोम्मावर, आनंदी गायकवाड, श्लोक बोम्मावर, उदांत रोहरा, प्रीतिका रोहरा, हरीश आत्राम, मुकेश कुळमेथे, आदिती त्रीपुरवार ग्रीन बेल्ट मध्ये नेत्रा मद्दीवार, आदिश शेख, तुप्ती बंडे, आर्या येल्केवर, समृद्धी उपलपवार, अर्णव मुप्पावर, स्वरा मुक्कावर, श्रेष्टीता नीलम, कौशिक गन्धम, रुकशिका गन्धम, कार्तिक रच्चावर, साफल्य जैनवार, ब्राऊन बेल्ट इच ज्युनिअर मध्ये शर्वरी नागरे, वैष्णवी मोरे, रिद्धी देशपांडे, प्राची येनगंनटीवार, परिणीती पोहनेकर, इशिता मुप्पावर, चित्रा गोगीकार, याचिका गौतम, स्मिता अग्गुवार, अक्षरा तालाकवार, शंतनू नागरे, कुशल तलांडे, सोहम मोरे, स्पंदन भुरसे, कार्तिक येमुलवार, पृथ्वी वरठे, वेदकुमार शेकुर्तीवार, रुद्राक्ष पुपरेडीवार, रेयान सिज्जो, उज्ज्वल गौतम, नील बोमकंटीवार, युगांत बोबाटे आदी कराटे पट्टुनी डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून यश संपादन केले.

या पदवी परीक्षेकरिता मुख्य अथीती म्हणून अंकित सर सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालय अहेरी हे उपस्थित होणार होते परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रम मुळे ते उपस्थित राहू शकले नाही. अँड. स्वाती जैनवर, किरण भांदककार (इंडियन वुमेन ओलेम्पिक असो. महाराष्ट्र उपाध्यक्षा ) मुक्तेश्वर गावडे सर अध्यक्ष जी.डी.के.ए, मुख्य प्रशिक्षक तथा परीक्षक प्रा.सेन्साई रवि भांदककार, यांच्या उपस्थितीत पदवी वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला.

विदर्भाचे मुख्य प्रशिक्षक व परीक्षक सेन्साई अरविंद पाटील सर नागपूर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाकरिता पालक सहकारी वर्गातून राजू नागरे, संजय देशपांडे, प्रशांत जोशी, रविकुमार गन्धम, सय्यद, अतुल सिंगरू, रघुनाथ तलांडे, विनी रोहरा, अशोककुमार गौतम, सुर्यकांत मोरे, विर ब्राम्हन्गारू मंदिर संस्थानचे अध्यक्ष नानाजी जक्कोजवार व सर्व पालकवर्ग आदींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

सध्याच्या कोरोना परिस्थितीवर सर्व विध्यार्थी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीरयष्ठी व बुद्धी मजबूत करीत आहे व सोबतच विविध स्पर्धाकरिता उत्तुंग भरारी घेण्यास सर्व कराटे पट्टु तयार आहेत. असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक व परीक्षक प्रा. सेन्साई रवि भांदककार यांनी यावेळी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :

अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

भामरागड- लाहेरी मार्गावर आढळले नक्षली पत्रके व बॅनर, नक्षल सप्ताह पाळण्याचे केले आवाहन

 

Comments are closed.