Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अचानक लागली घराला आग, आगीत वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भुसावळ, दि. २६ मार्च :  शहरातील महेश कॉलनी परिसरातील एका फ्लॅटला पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत कुटुंबातील वडिलांचा होरपळून मृत्यू झाला असून मुलगा होरपळला गेला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्ये मध्ये दुसर्‍या मजल्यावर केशवाला वाधवाणी हे आपल्या कुटुंबासह राहतात. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू आल्या. तसेच आगीच्या ज्वाला आणि धुर बाहेर निघू लागला. यामुळे इमारतीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी त्यांना वाधवाणी यांच्या घराला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना पाचारण केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फायरब्रिगेडच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. दरम्यान, या आगीत केशवलाल वाधवाणी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीररित्या होरपळला गेला आहे. त्याला उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुस्लिम प्रिन्सिपल महिलेच्या राजीनाम्यानंतर हिजाब प्रकरणाची विरारमध्ये चर्चा

धक्कादायक! अनैतिक संबंधातुन एकाचा खून : एकाला अटक

प्रत्येक आईने आपल्या मुलीला चांगल्या कामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे – हेमामालिनी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.