Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाघाच्या हल्यात महिलेच्या मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १७ डिसेंबर: गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या राजगाटा चक च्या जंगलात नरभक्षक वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृतक महिलेचे नाव अनुसया शामराव मोंगरकर (५८) असून राजगाटा चक या गावातील राविवासी आहे. सदर मृतक महिला आज दुपारच्या सुमारास झाडण्याच्या काळ्या गोळा करण्यासाठी वन विकास महामंडळाच्या कक्ष क्रं. १ मध्ये जाऊन वनात झाडण्याच्या काळ्या गोळा करीत असतांना अचानक दबा धरुन बसलेल्या नरभक्षक वाघाने महिलेवर हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना प्राप्त होताच गडचिरोली पोलीस विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यासह वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून महिलेचे मृतदेह शविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.