Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विषारी सापाशी खेळणे आले अंगलट; युवकाने गमावले प्राण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अत्यंत विषारी सापाशी खेळ कसा जीवावर बेतू शकतो हे आज पुन्हा एकदा मुंब्र्यातील घटनेवरून सिद्ध झाले.

ठाणे :  मुंब्र्यातील संजयनगर येथे राहणारा २० वर्षीय मोहम्मद शेख या युवक टाईमपास करण्यासाठी मुंब्रा बायपास येथे आला असता त्याला लालकीला ढाब्याजवळ एक अत्यंत विषारी साप दिसला. अत्यंत डोंगराळ भाग असल्याने व डोंगरातच झोपड्या बांधल्याने पावसात अनेक वन्यजीव इथल्या वस्त्यांमध्ये घुसतात. केवळ मजा म्हणून मोहमद ने सापाचे डोके आपल्या हातात धरून सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तशाच अवस्थेत तो गावदेवी मार्केट परिसरात फिरत असताना अनेकांनी त्याला हटकले व सापाला सोडून देण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मोहम्मद चे मित्र त्याचे चाळे मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. खेळता खेळता त्याची पकड सैल होताच सापाने तीन वेळा त्याचा चावा घेतला परंतु त्यावेळी त्याला काहीच जाणवले नाही.

काही वेळाने त्याने सापाला एका झुडपात सोडून दिले. त्यानंतर मोहम्मदला सापाने चावा घेतल्याचे जाणवू लागले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. मोहम्मदच्या संपूर्ण  शरीरात विष भिनल्याने त्याला त्रास होऊ लागला होता. त्याला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भर्ती करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून सर्वत्र ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

अबब! १२ फुटाची महाकाय मगर पकडली सांगलीवाडीत

नक्षल्यांनी बॅनर बांधून पैड़ी चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांना वाहीली श्रद्धांजली

Exclusive News : प्रसूतीच्या कळा अन् १५ किलोमीटरची पायपीट….

 

ग्रामपंचायत आलापल्लीच्या ग्राम सदस्याचा सरपंचासह प्रशासनाच्या विरोधात एल्गार!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.