Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डॉ.अनिल हिरेखन यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली ,दि.२१ :  गोंडवाना विद्यापीपीठात नव्याने रुजू झालेले उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी आज गोंडवाना
विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल झेड. चिताडे यांच्या कडून  स्विकारला असून डॉ. हिरेखन यांना प्रशासनिक कामाचा १९ वर्षांचा अनुभव आहे.

डॉ. अनिल हिरेखन नागपूर विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून कार्यरत होते.याशिवाय जून ते ऑगस्ट २०१५ ला परीक्षा नियंत्रक म्हणून कारभार सांभाळला. त्यांनी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी म्हणूनही सेवा दिली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदावर एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या काळात ते कार्यरत होते.जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या काळात कुलसचिव (प्रतिनियुक्ती) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.२०१५ साली नागपूर विद्यापीठाचे सर्वोत्तम अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. साडेतीन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून १९९९ ते २००३ या काळात रामटेकच्या कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स येथे विद्यापीठ मान्यता प्राप्त प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

४ डिसेंबर २०२० पासून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव पद रिक्त होते. त्यामुळे संचालक परिक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. अनिल झेंड. चिताडे यांच्या कडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. आज डॉ. अनिल हिरेखन यांनी या पदाचा पदभार स्विकारला असल्याने गोंडवाना विद्यापीठाच्या  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यापीठाचे व्हिजन आणि मिशन आपल्याला साध्य करायचे आहे .तसेच विद्यार्थी हा विद्यापीठाचा कणा आहे. त्यामुळे त्यांना चांगली सेवा देणे हे महत्त्वाचेआहे.असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे संचालन सतिश पडोळे यांनी तर आभार संदेश सोनुले यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

“मिनिमम बॅलन्स” शुल्क बँक आकारू शकत नाही

अतिशय दुःखद घटना..पत्रकार राम परमार यांचे निधन

 

गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.