Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकिंग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार

पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली, दि. ४ जून : पुणे-बंगळुरू महामार्गावरील कासेगाव या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाले आहेत.रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर जाऊन भरधाव चार चाकी गाडी आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.यामध्ये तीन जण जागीच तर दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

वाळवा तालुक्यातल्या कासेगाव येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर चार चाकी गाडी ला भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे,सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत,हे सर्व जण कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथून जयसिंगपूरकडे येण्यासाठी निघाले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुणे-बंगळूर महामार्गावर कासेगाव नजीक आले असताना, येवलेवाडी फाटा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कंटेनरवर जाऊन शिरोटे कुटुंबांची भरधाव चार चाकी गाडी आदळली,हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. आणि यामध्ये 2 जागीच ठार झाले, तर 3 जण हे उपचारादरम्यान मयत झाले आहेत.घटनास्थळी कासेगाव पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा करत अपघाताची नोंद केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

 

 

 

Comments are closed.