Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी.

वाघांचा वावर वाढलेल्या जंगलात न जाण्याचे वन विभागाचे आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 09 सप्टेंबर :-  गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी गेला आहे. कृष्णा महागु ढोणे वय ६० वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास कळमटोला येथील जंगलात गुरे चारत असताना कृष्णा यांच्यावर वाघाने जीवघेणा हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे कळमटोला येथील जंगलात वाघांचा वावर वाढल्याने या जंगल परिसरात न जाण्याबाबत नागरिकांना सूचना देऊनही नागरिकांकडून याबाबतीत गांभीर्य पाळले जात नाही त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे बोलले जात आहे.

गडचिरोली शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमटोला येथील जंगलात कक्ष क्रमांक 415 येथे अमिर्झा ते गडचिरोली रोड पासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर जंगल परिसरात कृष्णा ढोणे हे गुरे चराई करिता गेले होते. परंतु आज शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमाराला बेसावध असलेल्या गुराखी कृष्णा महागु ढोणे यांच्यावर हल्ला करून ठार केले. विशेष म्हणजे कृष्णा यांना वनविभागाने जंगलात वाघांचा वावर वाढल्यामुळे गुरे चारण्यासाठी जाऊ नये याबाबत नोटीस देखील बजाविली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वन अधिकाऱ्यांनी दिलेली ही नोटीस

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गेल्या काही दिवांपासून गडचिरोली वन वृत्तातीलतील वडसा आणि गडचिरोली विभागात वाघाच्या हल्ल्यात हल्ल्यात वाढ झाली आहे. मात्र ज्या भागात वाघांचा वावर जास्त वाढला आहे, अशा जांगलात नागरिकांनी जाऊ नये यासाठी वन विभागातर्फे जन जागृती अभियान राबविण्यात येते. मात्र तरी देखील गुरे चारण्यासाठी किंवा सरपणासाठी लोक जंगलात जातात. त्यामुळें वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा :- 

Comments are closed.