Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोंढाळी बस स्थानकाचे डांबरीकरण सुरू

सलील देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

काटोल, 06 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाच्या काटोल आगारांतर्गत येणारे कोंढाळी बसस्थानकाचे बसस्थानकाच्या वाहन तळाची गिट्टी पूर्णपणे उखडली होती. गिट्टी पूर्ण पने उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये भरलेले गढूळ पाणी बसच्या टायरमधून उडून शालेय विद्यार्थी व प्रवाशांच्या अंगावर उडत असे. या सोबतच उखडलेली गिट्टीचा मार विद्यार्थी व प्रवाशांना बसत होता. कोंढाळी बसस्थानकाच्या या समस्येकडे कोंढाळी ग्रामपंचायतीचे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास ग्राम पं.स.सदस्य संजय राऊत, यांनी माजी गृहराज्यमंत्री व काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचे कडे बसस्थानकाच्या दुरुस्तीची मागणी केली.

येथील बसस्थानकाच्या वाहन तळ दुरूस्ती साठी एसटी प्रशासनाच्या अधिकार्यां सोबत बैठक घेऊन डांबरी करण निधी मंजूर करण्यात आला. मात्र या दरम्यान, जागतिक महामारी कोविडमुळे अडीच वर्षांपासून बांधकाम होऊ शकले नाही. या नंतर या वर्षी पुन्हा : येथील बसस्थानकाचे डांबरी करण्यासाठी जि.प.सदस्य सलील देशमुख यांनी एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक व विभाग नियंत्रक, तसेच एस. टी महामंडळाच्या बाधकाम अभियंते यांच्या सह कार्यालयात दोन दोन वेळा बैठका घेऊन येथील डांबरी करणचे काम सुरू करण्याची मागणी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जि प सदस्य सलिल देशमुख यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व कोंढाळी येथील बसस्थानकाच्या डांबरीसाठी निविदा काढण्यात आल्या. या कामा करीता तिन तीन वेळा निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर निविदा मंजूर करून कार्य आदेश ही निघाला मात्र मागील महिन्यात पावसाने सलग हाजेरी लावल्याने डांबरी करण्‍यासाठी सुरुवात झाली नव्हती. अखेर सलील देशमुख यांनी एसटी महामंडळाचे सार्वजनिक बांधकाम अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करून, अखेर बहू प्रतिक्षित कोंढाळी बसस्थानकाच्या डांबरी करणचे काम 05 नोव्हेंबर रोजी बांधकाम अधिकारी कटारे व एसटी महामंडळाचे बांधकाम सहकारी यांच्या देखरेखीखाली बसस्थानकाच्या डांबरी करणचे काम सुरू करण्यात आले.

राज्यातील गडचिरोली ते पुणे-नाशिक या लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्यप्रवासाच्या तसेच कोंढाळी आणि जवळपासच्या ४३ गावांतील हजारो प्रवासी आणि दोन हजारांहून अधिक पासधारक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सोयीसाठी येथील बस स्थानकाला अत्यावश्क (मुलभूत व पायाभूत) सोई सवलती करिता माजी गृह मंत्री व आमदार अनिल देशमुख यांच्या मागणी वरून राज्य सरकारकडून दोन कोटी ऐंशी लाखांचा विकास निधी मंजूर करून घेण्यात सलील देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र मागील सरकारने मंजूर केलेला विकास कामांचा निधी रोखल्या गेल्याने मंजूर कामें रखडल्याने कोंढाळी-काटोल-नरखेड या बसस्थानकांसाठी मंजूर बांधकाम निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास, पंचायत समिती सदस्य अरूण उईके, ग्रा. पंचायत सदस्य संजय राऊत, खुर्सापार चे सरपंच सुधीर गोतमारे, रामदास मरकाम, पदम पाटील डेहनकर, नरेश नागपूरे, सतीश पुंजे, प्यारू पठाण, ब्रजेश तिवारी, नरेश सेंगर, अन्सारबेग, राजेंद्र खामकर, अफसर हुसेन, बबलू बिसेन, अश्पाक काझी, रूपेश बुरडकर, पवन पेंधाम, राजू किनेकर, दुर्गा प्रसाद पांडे, अब्दुल खालिक शेख, व रा का चे युवक व विद्यार्थी कांग्रेस चे पदाधिकारी आकाश गजबे, नितीन ठवळे, आयुष्यमान पांडे, सदाप पठाण, रोहीत गोलाईत आदींनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.