Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जालण्यात उद्या लसीकरणाची रंगीत तालीम

उद्याच्या ड्रायरन च्या नियोजनासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

विजय साळी, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. ०१ जानेवारी: गेल्या वर्षात कोरोनाने घातलेला कहर थांबवीण्यासाठी कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरेल अशी लस उपलब्ध झाल्यावर ती देण्याची तयारी केंद्र शासनाने केली असून महाराष्ट्रात देखील उद्या या लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जालना, पुणे, नागपूर व नंदुरबार या 4 जिल्ह्यांची यासाठी निवड झालेली असल्याने या उद्याच्या रंगीत तालीमेच्या पार्श्वभूमीवर आज जालना येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून मेडिकल, नॉन मेडिकल अश्या सर्व व्यवस्थांची माहिती घेतली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जालना जिल्ह्यातील जालना जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड व बदनापूर तालुक्यातील शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम घेण्यात येणार असून यात प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थ्यांची ड्राय रन घेण्यात येईल अशी माहिती जालन्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले यांनी दिली.

उद्याच्या ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्र निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्रायरनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे. प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जात आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षेच्या  सोबतच प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जाणार आहेत याचे नियोजन देखील आज करण्यात आले. जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेलगाव या ठिकाणी लसीकरणाचा ड्रायरन होणार आहे.

Comments are closed.