Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनरक्षक प्रशिक्षण बॅच क्रमांक – 57 चे रमेश कचरु रामटेके प्रथम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. 22 जून :  वनविभागात वनरक्षक या पदावर भर्ती झाल्यावर त्यांना 6 महीण्याचे वनरक्षकांसाठीचे सेवाअंतर्गत प्रशिक्षण पुर्ण करावे लागते. कोरोना विषाणुच्या प्रर्दुभावामुळे सन 2019 पासुन सदर प्रशिक्षण बंद होते शेवटी सन 2021 मध्ये पुन्हा प्रशिक्षण सुरु करण्यात आले होते व दिनांक – 15 नोव्हेबर 2021 ते 19 जुन 2022 या कालावधीत महाराष्ट्रातील 4 प्रशिक्षण संस्था मध्ये सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे बॅच क्रमांक 57 चे प्रशिक्षण पुर्ण झाले असुन दिनांक 18 जुन 2022 रोजी पासींग आउट परेड व प्रमाणपत्र वितरण दिक्षांत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जयोती बॅनर्जी, (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती हया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन डी. पी. निकम (भा.व.से.), वनसंरक्षक सामाजीक वनीकरण अमरावती हे होते तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन  चंद्रशेकरन बाला, (भा.व.से.) उपवनसंरक्षक अमरावती वनविभाग, सुमंत सोळंके, (भा.व.से.) उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा, विनोद डेहनकर, विभागीय वन अधीकारी (दक्षता), अमरावती वनवृत्त करे, विभागीय वन अधिकारी सामाजीक वनिकरण अमरावती, तसेच वन प्रशिक्षण संस्था चिखलदराचे संचालक  बहाळे सर, सत्र संचालक थिगळे सर, उपसंचालक गुल्हाने सर, वन प्रशिक्षण संस्था चिखलदराचे कवायत ‍शिक्षक आकेवार सर, व चिखलदरा येथील जेष्ठ नागरीक यांच्या प्रमुख्य उपस्थितीत हा दिक्षांत समारंभ कार्यक्रम पार पडला.

या संस्थेत गडचिरोली, चंद्रपुर, व अमरावती या तिन वनवृत्तातील एकुण 65 प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण पुर्ण केले असुन सदर प्रशिक्षणात तब्बल 6 विषयात गोल्ड मेडल घेत 83.82 टक्के गुण प्राप्त करुन गडचिरोली वनवृत्ताचे वनरक्षक रमेश कचरु रामटेके यांनी गुणानुक्रमे प्रथम आले असुन त्यांनी वन्यजिव व्यवस्थापन, वन उपयोगीता, वन अभियांत्रिकी, वनसंरक्षण, वनसंवर्धणशास्त्र, व संयुक्त वनव्यवस्थापन, या 6‍ विषयात गोल्ड मेडल पटकवीले आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयोती बॅनर्जी, (भा.व.से.) मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांचे हस्ते सन्माचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गैविण्यात आले. तसेच स्व. दीपश्री हींगणीकर मेमोरीयल ट्रस्ट अचलपुर जि. अमरावती यांचे कडुन वनरक्षक श्री. रमेश कचरु रामटेके यांना सन्माचिन्ह व 3100/- रुपये रोख ‍शिष्युवृत्ती देवुन गौरवान्कीत करण्यात आले. वनरक्षक प्रशिक्षणात प्रथम आलेल्या वनरक्षकास तात्काळ पुढील पदावर बढती दीली जाते परंतु काही वर्षापासुन ही बढती बंद करण्यात आली आहे. या प्रशिक्षणात प्रथम येणाऱ्या वनरक्षकास मानाचे स्थान असुन रमेश कचरु रामटेके हे गुणानुक्रमे प्रथम येते त्‍यांनी गडचिरोली वनवृत्ताचे नाव लौकीक केले आहे. त्याबध्दल त्याचे वनवृत्ताच्या वतीने सर्वत्र गौरव करण्यात येत आहे.

या यंशाबध्दल या संस्थेचे संचालक बहाळे सर, उपसंचालक  थिगळे सर,  गुल्हाणे सर, कवायत शिक्षक आकेवार सर यांनी रमेश कचरु रामटेके यांचे कौतुक केले आहे.

या कार्यक्रमाचे संचालन थिगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आकेवार यांनी केले.

रमेश कचरु रामटेके, वनरक्षक यांनी वृत्तपत्राशी बोलतांना “वनरक्षकांसाठीचे सेवतंर्गत प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक असुन या शिवाय परीपुर्ण वनरक्षक होवु शकत नाही. पुर्वी या प्रशिक्षणात गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या वनरक्षकाला वनपाल या पदावर तात्काळ बढती देत असत परंतु काही वर्षापासुन बढती देणे बंद आहे. सदर बढती देण्याची प्रक्रीया पुर्ववत सुरु करण्यात यावी जेनेकरुन त्यांना प्रात्साहन मिळेल”.

 

Comments are closed.